* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> कैद्याला अमली पदार्थ पुरविण्याच्या प्रकरणी आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदाराला अटक – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
गुन्हे-वृत

कैद्याला अमली पदार्थ पुरविण्याच्या प्रकरणी आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदाराला अटक

मुंबई, दि. ९
आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदार विवेक नाईकला कारागृहातील कैद्याला अमली पदार्थ पुरविण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाईक आर्थर रोड तुरुंगात कैद्यांना अमली पदार्थ पुरवत असे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ७० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. पोलिसांनी नाईक विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आर्थर रोड कारागृहाच्या मुख्य दरवाजापाशी नाईकला अटक करण्यात आली. त्याने चरसच्या आठ कॅप्सूल अंतर्वस्त्रात लपविल्या होत्या. नाईककडून या कॅप्सुल जप्त करण्यात आल्या. राहुल नावाच्या कैद्याने नाईकला या कॅप्सूल दिल्या होत्या. नाईक त्या कॅप्सुल आरोपी रशिदल देणार होता. चौकशी करणाऱ्या पोलीस हवालदाराला नाईकने जखमी केले आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्य दरवाजाजवळ त्याला ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *