ठाणे रेल्वे स्थानकात तीन हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल
ठाणे दि.१० :- विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकात ३ हजार ०९२ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला.
मुंबईत येत्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘मामी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
ठाणे स्थानकातील फलाट, पादचारी पुल, स्थानकाचे प्रवेशद्वार या ठिकाणी १२० तिकीट तपासनीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे ३० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. एका दिवसात इतकी मोठी प्रवासी संख्या आणि दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.