गोरेगाव, कांदिवली परिसरात ९ आणि १३ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद
मुंबई दि.०७ :- मालाड टेकडी जलाशयातील देखभाल, दुरुस्ती आणि काही तांत्रिक कामासाठी मालाड, गोरेगाव, कांदिवली आदी परिसरातील काही भागांमध्ये येत्या ९ आणि १३ ऑक्टोबर रोजी १६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
‘झोपू’ योजनेतील सर्व इमारतींचे आग प्रतिबंधक सर्वेक्षण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पी उत्तर विभागातील मालाड पूर्व, पी दक्षिण विभागातील गोरेगाव पूर्व आणि आर दक्षिण विभागामधील कांदिवली पूर्व येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर, लोखंडवाला, हनुमान नगर, वडार पाडा (१ आणि २) नर्सीपाडा आदी परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मालाड, गोरेगाव, कांदिवली आदी भागांतील नागरिकांनी ९ आणि १३ ऑक्टोबरच्या आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे.