‘झोपू’ योजनेतील सर्व इमारतींचे आग प्रतिबंधक सर्वेक्षण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.०७ :- झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सर्व इमारतींचे आग प्रतिबंधक सर्वेक्षण करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून इमारतींचे सर्वेक्षण आणि संरचनात्मक परिक्षणही केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) गोरेगावच्या उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीच्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र व राज्याची अशी एकत्रित सात लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.