दुर्मीळ गीते, चित्रपट गीतांचे संग्राहक विजय नाफडे यांचे निधन
मुंबई, दि.०६ :- दुर्मीळ गीते, चित्रपट गीतांचे संग्राहक आणि अभ्यासक विजय नाफडे यांचे बुधवारी वृध्दापकाळाने मुंबईत निवासस्थानी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात विवाहित पुत्र, विवाहित कन्या, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाफडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात कामाला होते.
गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांशी, विशेषत: संगीतकारांशी त्यांचे घनिष्ठ संंबंध होते. गाण्याचे वेड असलेल्या नाफडे यांनी आपले काम सांभाळून दुर्मीळ चित्रपट गीतांचे रेकॉर्ड संग्रह करण्याचा त्यांचा छंद आवडीने जोपासला. गेली काही वर्ष ते बेळगावात मुलीकडे वास्तव्यास होते. त्यांनी आपल्याकडील हा दुर्मीळ संग्रह बेळगावातील संगीत रसिकांसाठी खुला केला होता.