डोंबिवली नागरी सहकारी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदान
डोंबिवली दि.०६ :- डोंबिवली नागरी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह फेडरेशनचा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार कोटी पर्यंतच्या ठेवींचा टप्पा गाठण्यात बँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या ठेवींच्या गटातून डोंबिवली नागरी सहकारी बँक या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
दुर्मीळ गीते, चित्रपट गीतांचे संग्राहक विजय नाफडे यांचे निधन
महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ सनदी लेखापाल अजयकुमार ब्रम्हेचा यांच्या हस्ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे (डीएनएस) अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर, सरव्यवस्थापक रमेश सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. फेडरेशनच्या उपाध्यक्षा ज्योती कवाडे, संचालिका शशिताई अहिरे, बँकेचे संचालक सत्यनारायण लोहिया, जयंत पित्रे, मिलिंद आरोलकर आदी यावेळी उपस्थित होते.