स्लाईड शोमधून उलगडणार तमाशा आणि वारी!
ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम
कल्याण दि.०४ :- सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ५ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
भंडारे यांनी छायाचित्रे आणि पुस्तकांच्या माध्यमातून तमाशा आणि वारी या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
भंडारे यांची या विषयावरील वारी एक आनंदयात्रा आणि तमाशा एक रांगडी गंमत ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भंडारे यांच्याशी गप्पा आणि त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचा स्लाईड शो असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कडोंमपा महापालिका मुख्यालयासमोर, कल्याण पूर्व येथे संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.