कल्याण येथे दोन दिवसांचा अखंड वाचनयज्ञ!
कल्याण दि.२६ :- नव्या आणि जुन्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळविण्यासाठी आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमास अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, बालक मंदिर संस्था आणि कल्याण सार्वजनिक वाचनालय यांचे सहकार्य लाभले आहे.
अंधेरीतील सेव्हन सिल्स रुग्णालय बृहन्मुंबई महापालिकेने ताब्यात घ्यावे – राजेश शर्मा
कोणत्याही वयोगटातील वाचनप्रेमी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अभिवाचन, कथा वाचन, ललित वाचन ,काव्य संमेलन, बालसाहित्य वाचन ,महिलांचे काव्यसंमेलन , पत्रकारांचे अभिवाचन, भयकथा व आध्यात्मिक साहित्य वाचन अशी विविध सत्रे उपक्रमात होणार आहेत. उपक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
वाचनयज्ञात एक हजारहून अधिक वाचक वाचन करण्यासाठी तर दहा हजारहून अधिक रसिक वाचन ऐकण्यासाठी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी डॉ योगेश जोशी ९७५७०४४६१४/ हेमंत नेहते ८७७९६४४९९२/तेजस्विनी पाठक ९८२०७८४००८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.