रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी
मुंबई दि.२६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत माणगाव विभागीय क्रीडा संकूलाच्या उभारणीला मंजूरी देण्यात आली. बैठकीला महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (व्हिसीद्वारे), नगररचना संचालक अविनाश पाटील (व्हिसीद्वारे) आदी उपस्थित होते.
कल्याण येथे दोन दिवसांचा अखंड वाचनयज्ञ!
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांसाठी माणगाव हे मध्यवर्ती आहे. या चार जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरेल. या विभागीय क्रीडा संकुलासाठी ४० ते ५० एकर जागा आवश्यक असून जिल्हा प्रशासनाने ती तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.