येत्या ३ ऑक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन
मुंबई दि.२६ :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ ऑक्टोबर रोजी हैद्राबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
मध्य रेल्वेवरील चार स्थानकात सिनेडोम उभारणार
रिपब्लिकन ही संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची असून रिपब्लिकन पक्षाला आम्ही देशभरात पोहोचवले आहे. नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ आमदार निवडून आले आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे समुद्र किना-यांवर स्वच्छता मोहीम
देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशात रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे, असेही आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन हैद्राबाद येथील नामपल्ली प्रदर्शन पटांगणावर होणार आहे.