डॉ. सी.डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वनउद्यानाचा आराखडा सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि.२६ :- देशाचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वन उद्यानाचा आराखडा सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.
कल्याण येथे दोन दिवसांचा अखंड वाचनयज्ञ!
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील जामगाव (ता. रोहा) येथे डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते. या प्रस्तावित वनउद्यानाच्या आराखड्याचे वनविभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.