टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे भारतीय सैनिकांच्या विजयगाथेचे चित्र प्रदर्शन
डोंबिवली दि.२४ :- टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नमस्ते शौर्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैनिकांच्या विजयगाथेचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या २७ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत खुले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले
निवृत्त मेजर आर्किटेक्ट विनय देगावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. शौर्य फाऊंडेशनचे कुणाल आणि विलास सुतावणे, मंडळाचे अध्यक्ष सुशिल भावे, मंडळाचे उत्सव समिती प्रमुख नंदन दातार आदी यावेळी उपस्थित होते.
रेल्वे अपघातातील मृताच्या वारसांना आता पाच लाख तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये नुकसान भरपाई
हे प्रदर्शन टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव, सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात भारतीय सेनेची विजयगाथा तसेच पाकिस्तान आणि चीन सोबत झालेल्या युद्धातील काही छायाचित्रे तसेच भारतीय युद्ध नौका, वायुसेनेची हेलिकॉप्टर, काही विमानांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र विजेत्या भारतीय सैन्यातील २१ जवानांची माहिती येथे देण्यात आली आहे.