लोअर परळ येथील रेल्वे उड्डाणपुलाची पूर्व दिशेची बाजू सुरू
मुंबई दि.२० :- गेल्या किमान पाच वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळ येथील रेल्वे उड्डाणपुलाची पूर्व दिशेची बाजू रविवारपासून सुरू करण्यात आली. आता पालिकेच्या पूल विभागाने सहापैकी तीन मार्गिका सुरू केल्या आहेत.
गणेशोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त बसगाड्या
लोअर परळ पुलाच्या पश्चिम दिशेची बाजू जूनमध्ये सुरू करण्यात आली होती. तेव्हा संपूर्ण पूल सुरू करण्यासाठी जुलैची मुदत देण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या काळात लोअर परळ, करीरोड, लालबाग या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाची दुसरी बाजूही सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती.
यंदा हलालमुक्त गणेशोत्सव साजरा करा हिंदू जनजागृती समितीचे आवाहन
लोअर परळ पश्चिमेकडून पूर्वेकडे यायचे तर वाहनचालकांना मोठा वळसा घालून यावे लागत होते. लोअर परेळ नागरिक उड्डाणपूल कृती समितीने गेल्या आठवड्यात बुधवारी सायंकाळी परिसरात आंदोलन केले. तर गुरुवारी आमदार आदित्य ठाकरे यांनी पुलाची पाहणी केली. होती