गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदाच्या वर्षी १९१ कृत्रिम तलाव
मुंबई दि.२९ :- गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदाच्या वर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली असून यंदा मुंबईत विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी १६२ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
अकरावीच्या पाचव्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरातील २४ हजार ७२५ विद्यार्थी प्रवेशाविना
गेल्यावर्षी कृत्रिम तलावांमध्ये सुमारे ६६,१२७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी कृत्रिम विसर्जन तलावाची संख्या वाढत असून त्यात विसर्जित होणाऱ्या मूर्तींची संख्याही वाढत आहे. कृत्रिम विसर्जन तलावाबरोबरच काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे व फिरती विसर्जन स्थळेही असणार आहेत.