अक्षया आणि अक्षय म्हणतात ‘चूक भूल द्यावी घ्यावी’
मुंबई दि.१८ :- ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईक आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्या मुख्य भूमिका असलेले ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हे नाटक येत्या ऑक्टोबर महिन्यात रंगभूमीवर सादर होणार आहे.
‘जिजाऊ’ संस्थेतर्फे गणपती सजावट स्पर्धा
ज्येष्ठ अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर लिखित ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झाले होते. आता भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या नाटकाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे.
इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जण मृत्युमुखी; एकाचा शोध सुरू
केतकी प्रवीण कमळे निर्मित ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटकाचे दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांचे आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन,नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. नाटकात महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही भूमिका आहेत.