इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जण मृत्युमुखी; एकाचा शोध सुरू
एका महिलेची सुटका तर एकाचा शोध सुरू
डोंबिवली दि.१६ :- डोंबिवली पूर्व भागातील आयरे गावात काल सायंकाळी धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुनील लोढाया मृत्यूमुखी पडले. त्यांच्या पत्नी दीप्ती लोढाया यांना ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी एका महिलेला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. ढिगा-याखाली अडकलेल्या अरविंद भाटकर यांचा शोध घेण्यात येत आहे.
मध्य रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा उपक्रमास सुरुवात
५० वर्षापूर्वी लोड बेअरिंग पध्दतीने बांधलेल्या आदीनारायण भुवन इमारतीत एकूण ४० कुटुंबे राहत होती. इमारत अतिधोकादायक असल्याने पालिकेच्या ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी या इमारतीमधील रहिवाशांना सदनिका रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली होती.
डोंबिवली पूर्व भागातील धोकादायक इमारत कोसळली – दोन जण अडकले असण्याची शक्यता
काही कुटुंबे अन्यत्र राहण्यास गेली तर काही कुटुंबांना शुक्रवारी सकाळी घराबाहेर काढण्यात आले. इमारतीमध्ये अरविंद संभाजी भाटकर (७०) हे एकटेच राहतात. ते बिछान्याला खिळून आहेत. सुनील बिरझा लोढाया (५५) आणि दीप्ती सुनील लोढाया (५४) हे दाम्पत्यही इमारतीत राहत होते. दीप्ती या मानसिकदृष्टया आजारी आहेत. भाटकर आणि लोढाया दोन्ही कुटुंबांनी घर सोडण्यास नकार दिला. काल सायंकाळी इमारतीचे दोन मजले कोसळले. त्या ढिगाऱ्याखाली हे तिघेजण अडकले.