साहित्य- सांस्कृतिक

‘जिजाऊ’ संस्थेतर्फे गणपती सजावट स्पर्धा

ठाणे दि.१६ :- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून गणपती सजावट स्पर्धा २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आणि घरगुती गणपती सजावटीसाठी भरघोस पारितोषिके देण्यात येणार आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यासह रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग  जिल्ह्यात स्पर्धा होणार असून महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा  ठाणे, भिवंडी, कल्याण- डोंबिवली, वसई-विरार महापालिका क्षेत्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र घरगुती गणपती गणपतीसाठी ही स्पर्धा असणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfo3dUrFiH3gxKWmgbG3xIQXHVhU1ZdJWek8Set-iEfutNMIA/viewform?usp=sf_linkयावर नोंदणी करता येणार आहे.
सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा (पालिका,नगर पंचायत व ठाणे  ग्रामीण क्षेत्र मर्यादित) उल्हासनगर,अंबरनाथ पालिका व ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांनी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdon-4x-uXAcyhM3p9J7yEcIn_soUwXvwxk6QJgVauILe2UXw/viewform?usp=sf_link  यावर नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी 7977238958 / 8805200520 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *