अन्न व औषध प्रशासनातर्फे शहरातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा
मुंबई दि.१५ :- अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) शहरातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये एफडीएने ७० हॉटेल्सविरोधात कारवाई केली असून नियमांची पूर्तता करेपर्यंत सहा नामांकित हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुमार विश्वकोशच्या पहिल्या खंडाच्या चौथ्या भागाचे प्रकाशन
पाली येथील ‘पापा पन्चो दा ढाबा’ या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबईत ससुमारे दहा हजारांहून अधिक शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेल्स आहेत.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या हॉटेल्समधील जेवण बनविण्याची पद्धत, स्वयंपाकघर, साफसफाई, कर्मचाऱ्यांची स्वच्छता, पिण्याचे पाणी या बाबींची तपासणी ‘एफडीए’ कडून करण्यात येत आहे. या कारवाईत प्रशासनाने मागील काही दिवसांत ७० हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या हॉटेल्समध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्या आहेत. तसेच मुंबईतील सहा नामांकित हॉटेल्सचा त्यात समावेश आहे.