मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे
मुख्यमंत्री शिंदे यांची जरांगे पाटील यांच्याशी चर्चा
मुंबई दि.१४ :- मराठा आरक्षणाबाबत गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सराटी गावात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांची लुटमार सुरूच; शासन ‘ऑनलाईन बुकींग ॲप’वर कधी कारवाई करणार?
या वेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी तुम्हाला उपोषण सोडण्याची विनंती केली, यासाठी तुमचे व तुमच्या सहकाऱ्यांचे धन्यवाद. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाला १६ व १७ टक्के आरक्षण दिले होते. त्यावेळी आपण अध्यादेश काढला, तेव्हा उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली.नंतर आपण कायदा केला. १२ व १३ टक्के आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयातही टिकला. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झाले.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जरांगे पाटील यांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुमचा मुलगा भारी आहे. स्वत:साठी नाही, समाजासाठी तो लढतोय. मनोजला मी गेली अनेक वर्षं ओळखतो. त्याने कोणताही प्रश्न वैयक्तिक फायद्यासाठी कधी मांडला नाही. जेव्हा जेव्हा तो मला भेटला, त्या त्या वेळी मराठा समाजाबद्दल, आरक्षणाबद्दल त्यानं सरळ भूमिका मांडली. एखादे आंदोलन, आमरण उपोषण करणे, जिद्दीने ते पुढे नेणे आणि त्याला जनतेचा प्रतिसाद मिळणे या गोष्टी खूप कमी वेळा पाहायला मिळतात. ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहाते, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.