बृहन्मुंबई महापालिकेतर्फे उद्या राष्ट्रीय अभियंता दिन सोहळ्याचे आयोजन
‘वंदे भारत ट्रेन’चे जनक सुधांशू मणी यांचे व्याख्यान
मुंबई दि.१४ :- भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महापालिकेतर्फे उद्या (शुक्रवार) राष्ट्रीय अभियंता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ‘वंदे भारत ट्रेन’चे जनक सुधांशू मणी महापालिकेच्या अभियंत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
महापालिका अभियंत्यांच्या कलाविष्काराचा कार्यक्रम यावेळी सादर असून अभियांत्रिकीशी संबंधित प्रत्येक विभागाची माहिती, कामगिरी याचेही सादरीकरण होणार आहे. महापालिका सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांचे ‘प्रशासकीय अभियांत्रिकी’ या विषयावर भाषण होणार आहे.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महापालिकेतील अभियंत्यांनी लिहिलेले लेख, काव्य, प्रवासवर्णन आदी साहित्याचे संकलन असलेल्या ‘मी अभियंता’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात होणार आहे. हा कार्यक्रम प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात दुपारी साडेचार ते रात्री दहा या वेळेत होणार असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.