टिळकनगर शाळेच्या लोकमान्य गुरुकुलात बैलपोळा साजरा
मुंबई, दि. १४
टिळकनगर शाळेच्या लोकमान्य गुरुकुलात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. बैलपोळ्याच्या निमित्ताने गुरुकुलमध्ये प्रत्यक्ष बैलाचे पूजन करण्यात आले आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
देशातील कृषीप्रधान संस्कृतीमध्ये शेतकरी राजा आहे. म्हणून शालिक दत्तू गायकर आणि मनुबाई शालीक गायकर या शेतकरी दांपत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.
लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
आगळावेगळा मातृदिन
श्रावण अमावस्या ‘मातृदिन’ म्हणून साजरी केली जाते. लोकमान्य गुरुकुलमध्ये मातृदिन साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांच्या आईंना गुरुकुलामध्ये आमंत्रित करण्यात आले होते.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईची पाद्यपूजा केली आणि गुलाबाचे फुल देऊन मातृ पूजन करण्यात आले. पार्थ चव्हाण, पियुष पितांबरे यांनी लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांचे पाद्यपूजन केले.ज्या विद्यार्थ्यांची आई नोकरीमुळे येऊ शकली नाहीत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षिकांना आई मानून यांचे पाद्यपूजन केले.
गुरुकुलाचे पर्यवेक्ष शांताराम बोरसे यांनी मातृदिनाविषयी माहिती दिली. मुख्याध्यापिका पावडे यांनी तसेच काही पालकांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलाचे उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी केले.