ठळक बातम्या

‘हर घर सावरकर समिती’तर्फे ‘गणपती आरास स्पर्धेचे आयोजन

मुंबई दि.१३ :- महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभलेल्या ‘हर घर सावरकर समितीतर्फे अखिल महाराष्ट्र गणपती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून स्पर्धेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र जीवनावर आधारित आरास, देखावे सादर करायचे आहेत.

महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श निर्माण करावा- राज्यपाल रमेश बैस

स्पर्धेत कौटुंबिक, सोसायटी, मित्रमंडळ, शाळा तसेच सार्वजनिक मित्रमंडळ अशा विविध स्तरांवर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. विविध विभागातील विजेत्या स्पर्धकांना १५ लाखांपेक्षा अधिक रक्कमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत, “हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन” यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी “हर घर सावरकर” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जात बदनाम होऊ नये, म्हणून मी दोन पावले मागे हटत आहे – मनोज जरांगे पाटील

२१ मे २०२३ रोजी किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक गुगल फॉर्म आणि QR कोड हर घर सावरकर समितीच्या https://www.facebook.com/HarGharSavarkar
या फेसबुक लिंकवर १९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *