Thursday, January 15, 2026
Latest:
ठळक बातम्या

धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास आवश्यक – शॉर्न क्लार्क

मुंबई दि.१३ :- प्रत्येक चिन्हातून सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धार्मिक चिन्हांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत आणि याचा प्रतिकूल परिणाम त्यांचे अनुयायी अन् भक्त यांवर होऊ शकतो. यासाठी धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे शॉन क्लार्क यांनी केले. बँकॉक, थायलँड येथे झालेल्या ‘टेंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल सायन्सिस २०२३’या परिषदेत क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘दैवी आणि दानवी – हिंदू आणि नाझी स्वस्तिक यांच्या आध्यात्मिक अंगांचा तुलनात्मक अभ्यास’ हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक डॉ. जयंत आठवले असून क्लार्क सहलेखक आहेत.

‘हर घर सावरकर समिती’तर्फे ‘गणपती आरास स्पर्धेचे आयोजन

क्लार्क यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला परिषदेत ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदू स्वस्तिक आणि हे स्वस्तिक ४५ अंशाने फिरवून काळ्या रंगात आणि लाल पार्श्वभूमीवर तयार केलेले नाझी स्वस्तिक यांतून प्रक्षेपित स्पंदने आणि ऊर्जा यांचा अभ्यास सादर केला. मूळ हिंदू स्वस्तिक चिन्हात मोठ्या प्रमाणात सकारात्मक स्पंदने आणि ऊर्जा तर नाझी स्वस्तिक चिन्हात मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने आणि ऊर्जा आढळली. तसेच नाझी स्वस्तिक दंडावर बांधल्यानंतर त्या व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढली आणि सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली. तर हिंदू स्वस्तिक दंडावर बांधल्यानंतर नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा वाढली, असे वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून केलेल्या संशोधनातून निष्पन्न झाले.

मुंब्रा रेतीबंदर परिसरात स्फोटकांचा साठा जप्त

ॐ या हिंदू धर्मातील चिन्हाचे संगणकीय फाँटमध्ये उपलब्ध दोन वेगवेगळे आकार आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ निर्मित ॐ अशा तीन ॐ चा दोन वेगवेगळ्या वैज्ञानिक उपकरणांनी अभ्यास केला. त्यात संगणकीय ॐ च्या एका आकारातून नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असलेली आढळली, तर दुसर्‍या आकारात काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली; मात्र ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने बनवलेल्या ॐ मधे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. यावरून धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करणे आवश्यक असे शॉन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *