महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श निर्माण करावा- राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.१२ :- महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे. बहुमाध्यमांच्या मदतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून राज्याने मतदार जनजागृतीबाबत देशापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. किशोरवयीन मुले व युवकांमध्ये मतदार जनजागृती करुन लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘मी द सुपरहिरो भारताचा नागरिक’ या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
जात बदनाम होऊ नये, म्हणून मी दोन पावले मागे हटत आहे – मनोज जरांगे पाटील
गरीब लोक मतदानाला आवर्जून जातात. परंतु अनेकदा सुशिक्षित आणि श्रीमंत लोक केवळ रांगेत उभे राहावे लागते म्हणून मतदान करीत नाहीत. मलबार हिल सारख्या सधन लोकांच्या मतदार संघात मतदानाचे प्रमाण कमी असते, असे नमूद करून गरिबांपेक्षा श्रीमंतांमध्ये मतदार जागृतीची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे महागाई भत्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार जागृती कार्यक्रमाची माहिती दिली. सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, ‘आगम’ संस्थेच्या संस्थापिका व पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व ‘आगम’ संस्थेशी निगडित निमंत्रित उपस्थित होते.