चारित्र्य आणि दृष्टीकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे – दीपक केसरकर
मुंबई दि.१३ :- विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांचे चारित्र्य आणि दृष्टीकोन उत्तम राहण्यासाठी चांगले वाचन गरजेचे असून कथासंग्रह यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. उत्तरप्रदेश सरकारच्या सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव तसेच नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकारच्या विश्वस्त डॉ.अनिता भटनागर जैन लिखित ‘दिल्लीची बुलबुल’ या सचित्र कथासंग्रहाचा मराठी अनुवाद करण्यात आला आहे.
धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास आवश्यक – शॉर्न क्लार्क
त्याचे प्रकाशन केसरकर यांच्या हस्ते काल ‘रामटेक’ या शासकीय निवासस्थानी झाले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण आणि नैतिकता हे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन उत्तम राखण्यात महत्वाचे घटक आहेत.
‘हर घर सावरकर समिती’तर्फे ‘गणपती आरास स्पर्धेचे आयोजन
त्याचबरोबर भाषा समृद्ध होण्यासाठी आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी देखील प्रादेशिक भाषेतील दिल्लीची बुलबुल सारखे कथासंग्रह उपयुक्त ठरत असल्याचेही केसरकर म्हणाले. निवृत्त महसूल सेवा अधिकारी आशू जैन, महाराष्ट्राचे बंदरे, परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, विद्या प्रकाशन मंदिर चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ जैन आदी यावेळी उपस्थित होते.