ठळक बातम्या

मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट सध्या तरी दूर – सातही तलावांमधील पाणीसाठा आता ९७ टक्के

मुंबई दि.११ :- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आता ९७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट सध्या तरी दूर झाले आहे. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात‌ १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात केली होती.

विवेकानंद सेवा मंडळातर्फे २५० वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण

जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली व पाणीसाठा ९० टक्क्यांवर आला. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीकपातीची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.‌

एसटी कर्मचाऱ्यांचे ११ सप्टेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमध्ये मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असावा लागतो. त्यामुळे वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते. सातही धरणांत सध्या १४ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या ९६.७९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *