विवेकानंद सेवा मंडळातर्फे २५० वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण
डोंबिवली दि.१० :- विवेकानंद सेवा मंडळातर्फे आयोजित हरित डोंबिवली उपक्रमाच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यांतर्गत आज सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माणगाव परिसरात १८ स्वदेशी वृक्ष लावण्यात आले. मंडळातर्फे २५० वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांचे ११ सप्टेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण
कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात विविध ठिकाणी एकूण ३०१ स्वदेशी वृक्ष लावण्यात आले. आगामी काळात या सर्व वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सर्व पर्यावरणप्रेमी डोंबिवलीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
चेंबूर-सांताक्रूझ उड्डाणपुलावर वाहनांच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी
आज झालेल्या कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषद शाळा सुधार समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय वझे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माणगावचे मुख्याध्यापक पडवळ सर, शाळेतील शिक्षक, प्रगती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक, निसर्गप्रेमी डोंबिवलीकर, विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. अनिल मोकल यांनी उपस्थितांना पंचप्रण व पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.