गुन्हे-वृत

मुंबई विमानतळावर साडेचार कोटी रुपयांचे साडेसात किलो सोने जप्त; सहा जणांना अटक

मुंबई दि.११ :- महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर साडेसात किलो सोने जप्त केले असून सोन्याच्या या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडेचार कोटी रुपये असून आरोपींमध्ये विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव

दुबई येथून आलेल्या प्रवाशाकडे मोठ्याप्रमाणात सोने असून त्याला विमान कंपनीचा कर्मचारी तस्करीत मदत करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विमान कंपनीत सुरक्षा विभागात काम करणाऱ्या उमर शेख याची तपासणी केली असता त्याच्या बुटांमध्ये १७०० ग्रॅम सोने सापडले. हे सोने जमीर तांबे नावाच्या प्रवाशाने आसनाखाली लपवले होते आणि विमानतळाबाहेर काढण्यास शेखला सांगण्यात आले होते.

मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट सध्या तरी दूर – सातही तलावांमधील पाणीसाठा आता ९७ टक्के

शेखच्या चौकशीतून यासीर डफेदारचे नाव समोर आले. सोने विमानातून बाहेर काढण्यासाठी शेखला ५० हजार रुपये मिळणार होते. याप्रकरणी फुकेटवरून आलेल्या आणखी एक प्रवासी मोहित लोटवानी याच्याकडूनही सोने स्वीकारण्यास शेखला सांगण्यात आले होते. त्या प्रवाशाने आणलेले १७०० ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. आरोपींना सोने वितळवण्यास मदत करणाऱ्या अमर लाल व किशोरकुमार लाल या दोन पिता-पुत्रांनाही अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *