लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रायोगिक तत्त्वावर क्लिनअप मार्शलची नेमणूक; खासगी कंपनीला कंत्राट
मुंबई दि.११ :- रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात क्लिनअप मार्शलची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुंबई विमानतळावर साडेचार कोटी रुपयांचे साडेसात किलो सोने जप्त; सहा जणांना अटक
यासाठी निविदा काढण्यात आल्या असून भारतीय रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांकडून हे क्लिनअप मार्शल दंड आकारणार आहेत. प्रवाशांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती आणि मदत करण्याचे कामही हे क्लिनअप मार्शल करणार असून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव
क्लीनअप मार्शलसाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबईतील सर्व मोठ्या स्थानकांवर टप्प्याटप्प्यांनी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.