हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून २२ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक – रात्री उशिरा आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द
मुंबई दि.११ :- हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून ते २ ऑक्टोबरपर्यंत २२ दिवसांचा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रायोगिक तत्त्वावर क्लिनअप मार्शलची नेमणूक; खासगी कंपनीला कंत्राट
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी हा रात्रकालीन ब्लॉक मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून रात्री उशिरा आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.