ठाणे शहरात सर्वपक्षीय बंद, सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त
ठाणे दि.११ :- मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आज ‘ठाणे बंद’ आंदोलन करण्यात आले. या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला आहे. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जालन्यातील मराठा आंदोलनात झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. बंदमुळे ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ, टेंभीनाका, कोपरी, वागळे इस्टेट भागातील दुकाने बंद आहेत. ठाणे परिवहन सेवेची वाहतूक सुरळीत आहे. रिक्षांची संख्या तुलनेत कमी आहे.