एसटी कर्मचाऱ्यांचे ११ सप्टेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण
१३ सप्टेंबरपासून राज्यतील प्रत्येक जिल्ह्यात आमरण उपोषण
मुंबई दि.१० :- वाढीव दराने महागाई भत्ता आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि १३ सप्टेंबरपासून राज्यतील प्रत्येक जिल्ह्यात आमरण उपोषण करणार आहेत. यामुळे ऐन गणेशोत्सवात एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने एसटी महामंडळाला शुक्रवारी आंदोलनाची नोटीस दिली.
मुंबईतील चौपाट्यांवर आता फिरती शौचालये
महामंडळासह शासनाकडे संघटनेकडून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह देण्याची मागणी करण्यात आली आहे.
चेंबूर-सांताक्रूझ उड्डाणपुलावर वाहनांच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी
एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्यावी, मूळ वेतनात जाहीर केलेल्या रकमेने सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली तफावत दूर करावी, सातवा वेतन आयोग देण्यात यावा, गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्यावे, भंगार बसेस काढून टाकण्यात याव्यात, कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या एस.टी. बसेसमध्ये मोफत पासची सुविधा द्यावी अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.