मुंबईतील चौपाट्यांवर आता फिरती शौचालये
मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईतील विविध चौपाट्यांवर २४ फिरती शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३ कोटी ४२ लाख रुपये खर्च येणार आहे. ही शौचालये सशुल्क ठेवण्यात येण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
चेंबूर-सांताक्रूझ उड्डाणपुलावर वाहनांच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी
या शौचालयांवर दोन किलो वॉटचे सौरऊर्जा पॅनल बसविण्यात येणार असून ही शौचालये खासगी संस्थेस चालविण्यास देण्यात येणार आहेत. शौचालयांना जलजोडण्या देणे शक्य होणार नसल्याने प्रत्येक शौचालयात एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणी येत्या १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू
पाणी उपलब्ध करणे संबंधित संस्थेस बंधनकारक असणार आहे. गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, अक्सा, गोराई या चौपाट्यांवर ही शौचालये उभारण्यात येणार आहेत.