महापालिका समुह विकासाच्या बृहत आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप- महापालिका आयुक्त दांगडे
कल्याण दि.०९ :- कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने समुह विकासाचा बृहत आराखडा तयार केला असून येत्या आठ दिवसात त्याला अंतिम स्वरुप देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
महापालिका समुह विकासाच्या बृहत आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप- महापालिका आयुक्त दांगडे
शहरांमधील सर्वाधिक चाळी, जुन्या इमारतींचे समुह असलेले भाग प्रशासनाने समुह विकासासाठी निवडले आहेत. डोंबिवलीतील आयरे आणि कल्याण मधील कोळसेवाडी हे दोन भाग केंद्रीत करुन विकास आराखड्याला अंतिम रूप दिले जाणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ
आवश्यक मंजुरी आणि ठेकेदार नियुक्तीनंतर या कामांना सुरुवात होणार आहे. डोंबिवलीतील दत्तनगर भागाचाही अशाच पध्दतीने विकास केला जाईल, असेही महापालिका आयुक्त दांगडे यांनी सांगितले.