आमदार अपात्रता प्रकरणी येत्या १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू
मुंबई दि.१० :- आमदार अपात्रता प्रकरणी येत्या १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत. सुनावणीसाठी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नोटीस पाठविण्यास सुरुवात झाली आहे
महापालिका समुह विकासाच्या बृहत आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप- महापालिका आयुक्त दांगडे
शिवसेना पक्षाच्या ४० आमदारांना तर उबाठा गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
आमदारांना सुनावणीच्या वेळी सर्व पुरावे सादर करावे लागणार असून अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तिवादही करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आता ही सुनावणी सुरू होणार आहे.