मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ
मुंबई दि.०९ :-मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील धरणक्षेत्रांत चांगला पाऊस होत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ात तीन टक्क्यांची वाढ झाली असून हा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
महापालिका समुह विकासाच्या बृहत आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप- महापालिका आयुक्त दांगडे
भातसा धरणाची पाणी पातळी शुक्रवारी सकाळी आठ वाजता १४०.२४ मीटरवर पोहोचली होती. दरम्यान रविवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.