अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
ठाणे दि.०९ :- ठाणे ते बदलापूर या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान उपनगरी गाडीच्या अपंगांसाठी असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने कारवाई केली.
महापालिका समुह विकासाच्या बृहत आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप- महापालिका आयुक्त दांगडे
अपंगांच्या डब्यातून प्रवास करतांना ठाणे रेल्वे स्थानकात ७२, डोंबिवली येथे ६७, कल्याण येथे ८० आणि बदलापूर येथे ५७ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ
या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी त्यांना कल्याण रेल्वे न्यायालयात विशेष न्यायालयात नेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अपंगांच्या डब्यातून पुन्हा प्रवास करताना आढळून आल्यास तुरुंगात पाठवले जाईल, अशी समजही या प्रवाशांना देण्यात आली.