रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई दि.०९ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी धिम्या मार्गावरील सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार असून काही लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
महापालिका समुह विकासाच्या बृहत आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप- महापालिका आयुक्त दांगडे
हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०४ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/ बेलापूर तसेच ठाणे ते पनवेल, ठाणे ते नेरुळ या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वाहतूक बंद असणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ
नेरूळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान लोकल सेवा सुरू राहणार आहे. ठाणे ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी घेणे मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.