राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन मोहिमेनिमित्त राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन
मुंबई दि.०८ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधीं जयंतीपर्यंतच्या कालावधीत केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्य रक्त संक्रमण परिषदेने येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वेच्छिक रक्तदान मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार दिगंबर विशे यांचे निधन
या मोहिमेंतर्गत रक्तपेढींच्या आवश्यकतेनुसार ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय राज्य रक्त संक्रमण परिषदेने केलेल्या सूचनेनुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑगस्टदरम्यान राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना सर्व रक्तपेढ्या, सरकारी रुग्णालयांचे प्रमुख आणि आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.