दहीहंडी फोडताना मुंबईमध्ये १०७ तर ठाण्यात १७ गोविंदा जखमी
मुंबई दि.०८ :- दहीहंडी फोडताना यावर्षी मुंबईमध्ये १०७ गोविंदा जखमी झाले असून जखमींपैकी १४ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्यात १७ गोविंदा जखमी झाले. केईएम रुग्णालयामध्ये सर्वाधिक ३१ जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यातील सात जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल बैस यांची राधा गोपीनाथ मंदिराला भेट
पोद्दार रुग्णालय १६ जखमींना उपचारार्थ आणले होते. त्यातील सहा जणांना रुग्णालयात तर राजावाडी रुग्णालयात १० जण उपचारार्थ आले असून, त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.