ठळक बातम्या

जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल बैस यांची राधा गोपीनाथ मंदिराला भेट

मुंबई दि.०७ :- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब इस्कॉनच्या गिरगाव चौपाटी येथील राधा गोपीनाथ मंदिराला भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल व रामबाई बैस यांनी भगवान राधा गोपीनाथांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला.

ठाण्यातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद

इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या मूर्तीचे देखील राज्यपालांनी यावेळी दर्शन घेतले व उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. मंदिराचे विश्वस्त गौरांग प्रभू यांनी राज्यपालांचे स्वागत केले व मंदिराची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *