प्रत्येक अनधिकृत बांधकामाप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा – महापालिका आयुक्त बांगर
ठाणे दि.०७ :- प्रत्येक अनधिकृत बांधकामाप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
घरगुती गॅस पुरवठा वाहिनीत बिघाड; कोपरी आणि मुलुंड परिसरातील २० हजार ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प
अनधिकृत बांधकामांना नवीन पाणी जोडणी मिळाली किंवा किंवा चोरून पाणी जोडणी घेतल्याचे उघड झाले तर कार्यकारी अभियंता यांना निलंबित केले जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. सदर बांधकाम अनधिकृत असून येथे कोणी घर घेऊ नये, असे फलक प्रत्येक अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी लावावेत, फलकाचा खर्च अनधिकृत
पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राज्यातही राबविणार
बांधकामाच्या मालमत्ता करास जोडून वसूल करावा, हा फलक कोणी काढल्यास त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. सहायक आयुक्तांकडून कारवाईत विलंब झाल्यास थेट जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.