घरगुती गॅस पुरवठा वाहिनीत बिघाड; कोपरी आणि मुलुंड परिसरातील २० हजार ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प
मुंबई दि.०७ :- महानगर कंपनीच्या गॅस पुरवठा वाहिनीत बिघाड झाल्याने आज सकाळी आठ वाजल्यापासून कोपरी आणि मुलुंड परिसरातील २० हजार ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला.
पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राज्यातही राबविणार
महानगर गॅस कंपनीकडून ठाणे आणि मुंबई परिसरात घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात येतो. संध्याकाळी गॅस पुरवठा सुरळीत होणार असल्याचा अंदाज आहे. मुलूंड पूर्व, पश्चिम आणि ठाण्यात कोपरी पूर्व भागातील २० हजार ग्राहकांवर याचा परिणाम झाला आहे.