* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राज्यातही राबविणार – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राज्यातही राबविणार

मुंबई दि.०७ :- केंद्र सरकारची पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर व लहान व्यावसायिकांना सवलतीच्या व्याजदराने आणि तारणमुक्त कर्ज देण्यात येणार आहे.

रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीसारख्या उत्सवांना परवानगी देणारे धोरण बदलण्याचा विचार करा

योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कारागीर म्हणजे बारा बलुतेदारांची प्रथमच नोंदणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना नुकतीच जाहीर केली आहे. देशभरात पुढील आठवडय़ापासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात पुन्हा पाऊसधारा

राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामागर विभागाने बुधवारी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व वित्त, नगरविकास, ग्रामविकास, कौशल्य, रोजगार व उद्योजकता या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांचा समावेश असलेली राज्य संनियंत्रण समिती स्थापन केली आहे.

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रतिनिधी समितीचे सदस्य असतील तर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *