करंजा ते रेवस जलमार्गाने बोटीतून दुचाकी घेऊन प्रवास करण्याची सुविधा पुन्हा सुरू
मुंबई दि.०५ :- करंजा ते रेवस जलमार्गाने बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपयात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उरण ते अलिबाग दरम्यान ४० किलोमीटरचा रस्ते प्रवास टाळता येणार आहे.
अंधेरी येथील नव्या जलतरण तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणार – मंगल प्रभात लोढा
एकेरी प्रवासासाठी २० रुपये तिकीट असून दुचाकी वाहनांसाठी ८० रुपये आकारले जाणार आहेत. अलिबागवरून मुरुड तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटक तसेच मुंबई व नवी मुंबईतील प्रवासी याच मार्गाला प्राधान्य देतात.
यंदाच्या गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास राज्य शासनाची परवानगी
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने हवामानातील वातावरणानुसार ही सेवा बंद करण्यात येते. यावेळी या प्रवासी बोटीतून ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांनाही बंदी असते. या बोटीतून दुचाकी वाहने ने आण १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.