बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात पुस्तक विक्रीचे दालन सुरू
मुंबई दि.०४ :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात पुस्तक विक्री दालन सुरू झाले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज उदघाटन झाले.
मुंबईत पुन्हा पाणीकपातीची शक्यता; सातही तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन १ ऑक्टोबरला निर्णय
प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत डिंपल पब्लिकेशनला येथे जागा देण्यात आली आहे. यावेळी उपायुक्त किशोर गांधी, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे आदी उपस्थित होते.
ई चलन प्रणालीद्वारे आकारण्यात येणारा दंड भरण्यास वाहनचालकांची टाळाटाळ
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मॅजेस्टिक प्रकाशनचे, तर विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात ज्योत्सना प्रकाशनचे पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. चेंबूर येथील महानगरपालिकेच्या जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलावाच्या परिसरात मनोविकास प्रकाशन या संस्थेला जागा देण्यात आली आहे. महापालिकेच्या उपक्रमाला मराठी साहित्य विश्वातील प्रकाशकांनी प्रतिसाद दिला असून या प्रकाशकांना अन्य प्रकाशकांची पुस्तकेही विक्रीसाठी ठेवता येणार आहेत.