राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे उद्या काळ्या फिती लावून आंदोलन
मुंबई दि.०४ :- जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या आणि इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या (५ सप्टेंबर) शिक्षक दिनी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत.
ई चलन प्रणालीद्वारे आकारण्यात येणारा दंड भरण्यास वाहनचालकांची टाळाटाळ
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. त्यावेळी राज्य सरकारने मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते.
अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात
सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले. मात्र या मागण्यांवर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.