कार्यान्वित न झालेली ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने सुरू करा – सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. १
महाराष्ट्रात एकूण १०८ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ मंजूर झालेली असून त्यापैकी केवळ ६३ कार्यान्वित आहेत. तर तब्बल ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर्स’ कार्यान्वितच नसल्याचे ‘माहिती अधिकारा’तून उघड झाले आहे. ही ट्रॉमा केअर सेंटर्स’ त्वरीत सुरू करावीत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे.
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर; शिक्षक दिनी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
सुराज्य अभियानने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरोग्य मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.
रस्ते अपघातात जखमींना त्वरीत उपाचार मिळावेत, म्हणून राज्यात अनेक ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू करण्यात आली.
सचिन तेंडुलकरकडून ऑनलाईन गेमिंगची जाहिरात; ‘भारतरत्न’ असल्यामुळे आंदोलन ; आमदार बच्चू कडू
मात्र वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये ६० हजार रस्ते अपघातात २७ हजार जणांचा मृत्यू झाला. ही संख्या दरवर्षी वाढतच आहे. पालघर जिल्ह्यात एकही ‘ट्रॉमा केअर युनिट’ कार्यान्वित नाही, तर सांगली जिल्ह्यात द्रुतगती महामार्गाजवळ असणार्या इस्लामपूरमध्ये युनिट मंजूर झाले आहे;
थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर बंद करून पर्यावरण जतन, संवर्धन चळवळीत सहभागी व्हा – प्रशांत अवचट
पण त्याची प्राथमिक स्तरावरील प्रक्रिया चालू झालेली नाही. मुंबई ते गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्या माणगांवातही ट्रॉमा केअर सेंटर चालू झालेले नाही. अशाच प्रकारे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील सातार्यातील खंडाळा येथील असल्याचे अभियानने या निवेदनात म्हटले आहे.
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दीष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक – राज्यपाल रमेश बैस
‘ट्रॉमा केअर सेंटर’ हा राज्यातील जनतेच्या जीविताशी निगडीत अत्यंत संवेदनशील विषय आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणीही अभियानने केली आहे.
——