राहुल गांधींच्या हस्ते राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरचे उदघाटन
मुंबई, दि. २
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने अत्याधुनिक वॉर रुमची स्थापना केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते टिळक भवन येथील ‘भारतरत्न राजीव गांधी सोशल मीडिया सेंटर’चे आज उदघाटन झाले.
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दीष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक – राज्यपाल रमेश बैस
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसची ही सोशल मीडिया टीम काम करणार आहे.
इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीत बोधचिन्हाचे अनावरण
सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे.
मोदी यांच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आम्ही देशभक्त ‘इंडिया’चे लोक एकत्र – संजय राऊत
भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी आणि भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी या मिडिया सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.
——-