खेळ

सचिन तेंडुलकरकडून ऑनलाईन गेमिंगची जाहिरात; ‘भारतरत्न’ असल्यामुळे आंदोलन ; आमदार बच्चू कडू

मुंबई दि.३१ :- सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करतो म्हणून आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळी तेंडुलकरच्या निवासस्थानी आंदोलन केले.

महाराष्ट्र शासनाचे गोविंदांना विम्याचे कवच! – १८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम मंजूर

काही ठिकाणी पैसा गुंतवून या जुगारावर लावण्यात येत आहे.‌ ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करता तर मग मटक्याचीही करा. ‘भारतरत्न’ असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केले नसते , असे कडू यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करत असल्याच्या प्रकरणी कडू यांनी याआधीही सचिन तेंडुलकर विरोधात नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *